‘इन्शाअल्लाह’ने मराठी कादंबरीच्या क्षितिजावर एक नवी आश्वासक पहाट, तिच्यातील उणीवा गृहित धरूनही उमलवली आहे!
‘इन्शाअल्लाह’ ही भारतातील एका मोठ्या वैचारिक पेचप्रसंगाला मुठीत धरू पाहणारी आव्हानात्मक साहित्यकृती ठरते. काल-अवकाशाचा विलक्षण प्रत्ययकारी आणि विस्मयचकित करणारा खेळ मांडत साकारलेली, कमाल उंचीची स्फोटक विचारकृती ठरलेली, लोकप्रियतेचे आणि विक्रीचे नवे उच्चांक गाठणारी एक बहुचर्चित कादंबरी भैरप्पांच्या ‘आवरण’च्या रूपाने यापूर्वी आपण अनुभवलेली आहे. ती नक्कीच भडकमकरांच्या डोळ्यापुढे असली पाहिजे!.......